Pune Programs

पुण्यात होणार्‍या आगामी कार्यक्रमांचे वेळापत्रक

आज रविवार
29 नोव्हेंबर 2026






रविवार
6 डिसेंबर 2026
08:30 सकाळी
थोरले नानासाहेब पेशवे मराठा साम्राज्याचे एकवीस वर्षे पंतप्रधान होते. या काळात अटक ते कटक असा साम्राज्यविस्तार झाला.
त्यानिमित्ताने वारसास्थळ दर्शन
थोरले नानासाहेब पेशवे मराठा साम्राज्याचे एकवीस वर्षे पंतप्रधान होते.
या काळात अटक ते कटक असा साम्राज्यविस्तार झाला.
त्यांचा जन्म वडगाव मावळ येथील साते येथे ६ डिसेंबर १७२१ रोजी झाला. म्हणून पुढील वारसा दर्शन कार्यक्रम आपण तिथे करत आहोत.

सहा डिसेंबरला सकाळी ८:३० वाजता जमणे
९ वाजता निघणे
१० ते ११:३० साते गावात
नानासाहेब पेशवे जयंती कार्यक्रमात सहभागी होणे
११:४५ ते १२ वडगाव मावळ येथील विजय स्तंभ पाहणे
१२ ते १ एखाद्या हॉटेलात आपापल्या खर्चाने जेवण करणे
२:३० पर्यंत पुण्यात परत येणे
जर आपण यासाठी स्पेशल बस ठरवली तर प्रत्येकी ४००/५०० रुपये प्रवासखर्च येईल असा अंदाज आहे.
आपण यात सहभागी होणार असाल तर खालील नंबरवर
साते सहलीला येणार
असा रिप्लाय द्यावा. संख्येचा अंदाज आला की बस बुक करता येईल.
Contact - ओंकार गोसावी-9850828110
आयोजक-लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी, क्लब हेरिटेज, एच. व्हि.देसाई महाविद्यालय इतिहास विभाग, महाराष्ट्र टाइम्स
स्थान-पुणे
पुणे शहर-Pune City