Pune Programs
नमस्कार पुणेकर नागरीक हो,
पुणे प्रॉग्रॅम्स ही पुण्यात होणार्या आगामी कार्यक्रमांची माहिती देणारी वेब-साइट आहे. इथे दिनांकाप्रमाणे कार्यक्रमांची यादी पहायला मिळेल.
त्यात कार्यक्रमाचा दिनांक, वार, वेळ, कार्यक्रमाचे नाव, अधिक विस्तृत माहिती, सहभागी कलाकार, कार्यक्रमाचे ठिकाण, त्या ठिकाणाचा पत्ता, गूगल मॅपवरील लोकेशन, कार्यक्रमासंबंधी माहिती देणारी एखादी लिन्क, कार्यक्रमासंबंधी संपर्क मोबाईल नंबर असेल.
ज्यांना आपल्या येऊ घातलेल्या कार्यक्रमांची साइटवर एण्ट्री करावयाची आहे अशा कार्यक्रम संयोजकांनी मेंबरशिप घ्यावी. त्यासाठी लिन्कवर जाऊन मेंबरशिप फॉर्म भरून तो सबमिट करावा. त्यानंतर त्यांना मेंबरशिप मिळेल आणि आपल्या कार्यक्रमाची एण्ट्री करता येइल.
कुठल्याही कार्यक्रमाची माहिती पाहत असताना उजवीकडील कोपर्यात एक कॉपी बटन दिसेल. त्याला क्लिक करून त्या कार्यक्रमाची माहिती कॉपी करता येइल आणि नंतर व्हॉट्सपवरून ती माहिती मेसेजही करता येते
कुणीही सामान्य यूजर वापरू शकेल इतकी ही साइट सोपी केलेली आहे. तरीही काही शंका असतील तर admin @puneprograms.in या मेल आयडीवर मेल करून शंका विचारायला हरकत नाही.
वर दिलेल्या माहितीत काही अपुरेपणा असेल, नेमकेपणा नसेल, या साइटमधे काही चूक असेल तर कळवावे. साइटसंबंधी सूचना, सुधारणा सांगाव्यात.
इथे वापरलेली भाषा,मजकूर विचारपूर्वक वापरलेला आहे. त्यामुळे भाषेव्यतिरिक्त सूचना असतील तर अवश्य कळवाव्यात, स्वागत आहे.
-PunePrograms team